Ganesh Prabhakar Pradhan Sakal
पुणे

ग. प्र. प्रधान : चालते बोलते विद्यापीठ

गणेश प्रभाकर प्रधान हे प्रधान मास्तरांचे पुर्ण नाव. गणेश चतुर्थी दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणूनच आपले नाव गणेश ठेवले गेले, असे ते नेहमी सांगत.

सकाळ वृत्तसेवा

प्रधान मास्तरांची जन्मशताब्दी गुरुवारपासून (ता. २६) सुरु होत आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सहवासातील आठवणींना दिलेला हा उजळा...

गणेश प्रभाकर प्रधान हे प्रधान मास्तरांचे पुर्ण नाव. गणेश चतुर्थी दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणूनच आपले नाव गणेश ठेवले गेले, असे ते नेहमी सांगत. त्यांचा वर्धाक्याचा काळ हडपसर येथे गेला. या काळात विविध क्षेत्रातील नामवंत त्यांना भेटायला येत. सुदैवाने मास्तरांचा मी लाडका असल्याने त्यांनी जीवनातील अनेक आठवणी मला सांगितल्या.

संत सहित्याचे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण हे ५ डिसेंबर २००९ रोजी मास्तरांना भेटावयास हडपसरला आले होते. या भेटीत दोघेही बालपणीचे जवळचे मित्र असल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळाले. मास्तरांना त्यांचे बालमित्र पंडीत म्हणून संबोधित, असे डॉ. पठाण यांनी संगितले. या दोघांची जोड जणू ‘राम-रहिम’ सारखी होती. त्यांनी त्यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे तब्बल ८० वर्षे जपली.

मास्तरांच्या काही अनोख्या भेटीत शरद राव यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. गुरु-शिष्य अशी ही जोडी. पुढे राजकारणात भले विरोधक असली, तरी समाजकारण व नात्याला तडा जाईल, असे त्यांच्यात घडले नाही. शरद पवार हे मास्तरांचे आशिर्वाद व सल्ला घेण्यासाठी नेहमी त्यांच्याकडे येत. हडपसर येथील ‘रयत’च्या महाविद्यालयाला एस. एम. जोशी यांचे नाव देण्यात यावे, या मास्तरांच्या कल्पनेला शिक्का मोर्तब करत शरद पवार यांनी त्यांना गुरुदक्षिणा दिली. मास्तरांची दुरदृष्टी, प्रामाणिकपणा व कार्यावरील निष्ठा पाहून त्यांना काँग्रेस पक्षात येण्याचा आग्रह देखील करण्यात आला. तसेच त्यांना कबिनेट मंत्रीपद दिले जाणार असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु, मास्तरांनी हे प्रस्ताव फेटाळून विरोधी नेते पद सांभाळण्यातच धन्यता मानली. २० नोव्हेंबर २००६ रोजी साधनेने त्याचे एक पुस्तक प्रकाशन केले. मुखपुष्ट व आतील सर्व छायचित्रांसाठी ‘सकाळ’च्या ग्रंथालयााचे सौजन्य लाभले.

एकंदरीत मास्तर म्हणजे एक ‘चालते बोलते विद्यापीठ’ होते. अशी ऋषितुल्य माणसं शतकात एकदा तरी जन्माला यावीत, असे त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींना वाटणे स्वाभाविक आहे. मास्तरांना आधुनिक यूगातील ‘कर्ण’ संबोधले, तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.

- अस्लम जमादार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : देशातील पहिली डबल डेकर आणि एटीएम सुविधा असलेली ‘पंचवटी एक्सप्रेस’ आज ५० वर्षांची!

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT