साताऱ्यात होणार ‘एएसएम’चे राज्य अधिवेशन
सातारा, ता. १७ ः महाराष्ट्रातील आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधनिर्मिती केंद्रांसाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपैकी काही जाचक आहेत. यामुळे उद्योगाच्या विकासासाठी निमायक अंमलबजावणी व्यावहारिक, एकसमान आणि पूरक, असावी अशी मागणी आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (एएसएम) यांच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे.
आगामी काळात सातारा येथे राज्य अधिवेशन घेणार असल्याची माहिती एएसएमचे सचिव बाळासाहेब पाटील व अधिवेशनाचे अध्यक्ष सचिन काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वेस्टर्न महाराष्ट्र स्मॉल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष दिलीप गुणे, सुभाष वायचळ उपस्थित होते.
काकडे म्हणाले, की ॲलोपॅथी औषधांप्रमाणेच उत्पादनांच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेला स्टॅबिलिटी डेटाबाबत स्पष्टतेचा अभाव आहे. सुविधांच्या श्रेणी सुधारणेसाठी सुधारित अनुसूची लागू केल्याने एएसएम उद्योगांवर आर्थिक बोजा पडत आहे.
राज्यात आयुर्वेदिक चाचणी प्रयोगशाळांची कमतरता आहे. आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांच्या मंजुरीस विलंब होत आहे. यामुळे अनेक उत्पादकांचा इतर राज्यांत परवाने घेण्याचा कल वाढला आहे. यामुळे महाराष्ट्राचा महसूलही बूडत आहे. या व अन्य कारणांमुळे राज्यातील आयुर्वेदिक उद्योगाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. या व आदी विषयांबाबतचे ठराव अधिवेशनात केले जातील. ते ठराव सरकार दरबारी पाठविले जातील असे काकडे यांनी नमूद केले.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.