पुणे

एआयटीए टेनिस स्पर्धा

CD

फोटो ः अस्मी आडकर

पुण्याच्या अस्मी आडकरने पटकावले जेतेपद
एआयटीए टेनिस

पुणे, ता. १७ ः पुण्यात झालेल्या एआयटीए टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पुण्याच्या अस्मी आडकरने संपादिले.
पुण्यात सनी वर्ल्डज येथे संपलेल्या या स्पर्धेच्या अंतीम लढतीत सुमारे एक तासाच्या खेळानंतर अस्मी आडकरने आक्मक खेळ करताना श्रावी देवरेवर ६-०,६-१ असा सहज विजय मिळविला. तत्पूर्वी, अस्मी आडकरने पारी हेंगळेवर ६-०, ६-० अशी सहज मात करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत अस्मी आडकरने भक्ती ताजनेवर ६-१, ६-० असा, उपांत्यपूर्व फेरीत अस्मी आडकरने चुरशीच्या लढतीत शिबानी गुप्तेवर ६-३, ६-२ असा विजय मिळविला होता. तर उपांत्य फेरीतअस्मी आडकरने रुमा गायकैवारीला ६-०, ६-० असे हरविले होते.
विजेत्या अस्मी आडकरला साडेबारा हजार रुपये, करंडक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. अठरा वर्षीय अस्मी आडकरचे यंदाच्या मोसमातील हे पहिलेच विजेतेपद आहे. गेल्या मोसमात चेन्नई येथे झालेल्या अठरा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना तिला दुखापत झाल्याने ती गेल्या नऊ महिन्यांपासून कोर्टपासून लांबच होती. दुखापतीवरून सावरल्यानंतर तिची ही पहिलीच स्पर्धा होती. अस्मी आडकर अनिकेत वाकणकरकडे सराव करत असून ती फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT