पुणे

बंधक करून मागितली खंडणी

CD

कामासाठी आसामला गेलेल्या
दोन तरुणांना डांबून ठेवले
खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १७ : कामाच्या निमित्ताने आसाममधील गुवाहाटी येथे गेलेल्या नागपूरच्या दोन तरुणांना डांबून ठेवत त्यांच्या सुटकेसाठी १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात राकी भाई नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोमीनपुरा येथील रहिवासी असलेले दोन तरुण ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कामाच्या निमित्ताने गुवाहाटी येथे गेले होते. मात्र, तेथे पोचल्यानंतर दोघेही अडचणीत सापडले. सुमीत राजू शहारे (रा. भंडारा) याच्या बँक खात्याशी संबंधित प्रकरणातून राॅकी भाई नावाच्या व्यक्तीने हसनैन बिलाल आणि रोशन ऊर्फ जुबेर या दोघांना गुवाहाटी येथील एका अज्ञात ठिकाणी बळजबरीने डांबून ठेवल्याची माहिती समोर आली. दोघांना त्यांच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. आरोपीने दोघांच्या सुटकेसाठी १५ लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे संबंधित तरुणांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. खंडणीसाठी दबाव आणताना आरोपीने व्हिडिओ कॉलचा वापर केल्याचा आरोप आहे. या कॉलदरम्यान दोन्ही तरुणांना गुडघ्यावर बसवून त्यांचे हात दोरीने बांधल्याचे आणि त्यांना मारहाण केल्याचे दाखविण्यात आले. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

SCROLL FOR NEXT