assembly elections date announced Kasba Peth Chinchwad bypoll election date declares Maharashtra Election  
पुणे

Pune Bypoll Election: पुणे अन् चिंचवडची पोट निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra assembly bypoll Election 2023 : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबापेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झालं. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे ३ जानेवारी रोजी निधन झाले.

दरम्यान आता भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही जागेवर आता भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT