Access-to-Justive-for-all 
पुणे

कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांचे आर्थिक गणित लॉकडाऊनमुळे पुरते बिघडले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या कष्टकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. प्राधिकरणामार्फत दोन विधी सेवा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक शासन व कष्टकरी यांमध्ये समन्वय साधणार आहेत. मजूर राहत असलेल्या ठिकाणी जाऊन स्वयंसेवक त्यांच्याशी चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क केंद्राला कळविण्याचे काम स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच या तक्रारींचे निराकरण झाले की नाही, हेही या स्वयंसेवकांमार्फत पाहिले जाणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या लॉककडाऊनमुळे शहरासह जिल्ह्यातील मजुरांचे मोठे हाल होत आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याअंतर्गत कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी राहणार नाही. याबाबत दक्षता घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य व केंद्र सरकारकडून बेघरांसाठी, स्थलांतरित कामगार व गोरगरिबांना मोफत अन्नधान्य पुरविण्याच्या तसेच भोजन पुरवण्याच्या जाहीर केलेल्या सरकारी योजनांची  अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने समन्वयक म्हणून काम पाहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार समन्वयक नियुक्त करण्यात आल्याची माहिती  प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कामगार, मजूर वर्गाला अन्न, निवारा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील कामगारांना कोणत्याही अडचणी अथवा समस्या असल्यास त्यांनी 020-26111061, 7517768603 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  भागवत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT