distrubution 
पुणे

पिंपरी : विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना निवाला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या 14 स्वयंसेवी संस्था आणि अन्य 10 ते 15 संस्था मिळून 30 संस्थांच्या माध्यमातून शहरातील सुमारे 60 हजार गरजूंच्या पोटाला अन्न मिळत आहे.

मात्र अनेक परप्रांतिय कामगारांसह असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या निवासाच्या ठिकाणांची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोचत नसल्याचे चित्र आहे. 

अनेक कामगारांच्या जेवणाची सोय होत असली तरी अनेकांना मार्चचे वेतन मिळालेले नाही. तसेच एप्रिलचे वेतनही मिळेल याची शाश्‍वती कामगारांना वाटत नाही. महापालिकेशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि अन्य संस्था, संघटना यांच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या जेवणाची सोय झाली आहे. यासंदर्भात विविध कामगार नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कामगारांना साबण, खोबरेल तेल यासारख्या अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे कामगारही त्रस्त झाले आहेत.

महापालिकेकडे नोंदणीकृत नसलेल्या दहा ते 15 संस्था, संघटनाही त्यांच्या वतीने कामगारांना जेवण देत आहेत. साधारणपणे एक संस्था 400 ते 500 जणांना रोजचे जेवण देते. त्यानुसार सात ते नऊ हजार जणांच्या जेवणाची सोय होत आहे. 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी सांगितले, ""लॉकडाऊन संपल्यावर जे परप्रांतिय कामगार गेले आहेत, ते पुन्हा लवकर येण्याची शक्‍यता नाही. उलट जे कामगार येथे अडकले आहेत, ते सुद्धा निघून जाण्याची दाट शक्‍यता आहे.'' 
लोकजागर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांनी सांगितले, ""आमच्याकडे मदत मागण्यासाठी येणाऱ्या कामगारांची संख्या रोज वाढत आहे. सरकारने या कामगारांची सोय करावी.''

विश्‍वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार म्हणाले ""अनेक ठेकेदार त्यांच्याकडे 100 कामगार असतील तर त्यापैकी निम्म्या कामगारांनाच भविष्यनिर्वाह निधी, इएसआय सारख्या सुविधा देतात. त्यामुळे शहरातील ठेकेदारांकडेच कामगारांची नेमकी माहिती असू शकते. त्यामुळे त्यांच्याशी सरकार, उद्योजक यांनी संपर्क साधून कोणाला मदत मिळत नाही याची माहिती घ्यावी.'' 

केवळ बांधकाम क्षेत्रातील किमान एक हजार 700 कामगारांना जेवण मिळत नाही. त्यामुळे अन्य क्षेत्रातील अशा कामगारांची संख्या खूप जास्त असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
-जयंत शिंदे, अध्यक्ष- बांधकाम कामगार सेना 
 

मदतीचा हात... 

- महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेले धान्य- 20 टन 
- महापालिकेकडे नोंदणीकृत 14 संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जेवणाचे रोजचे लाभार्थी- 51834 

- लाभार्थ्यांसाठी महापालिकेने सुरु केलेल्या केंद्रांची संख्या - 97 
- नजीकच्या काळातील लाभार्थ्यांचे रोजचे उद्दीष्ट- 60, 000 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT