Assistant Commissioner of Police in Amravati committed suicide after shooting his wife and nephew in pune  
पुणे

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ! पुण्यात 'एसीपी'कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

रोहित कणसे

पुण्यात अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अमरावती पोलिस दलात कार्यरत असलेले एसीपी भरत गायकवाड हे पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट सापडली नाहीये. तसेच आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबात काही वाद झाल्याची प्राथमिक माहिती देखील मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT