कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अखंडपणे काम करत असलेल्या आरोग्य सेवकांचे आभार माजी सैनिकांनी भेट घेऊन मानले. 
पुणे

सक्षमपणे लढा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत करण्याचे माजी सैनिक संघटनेकडून आश्वासन

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांची नुकतीच माजी सैनिक संघटनेनी भेट घेतली. तसेच या कर्मचाऱ्यांचा कामा बद्दल त्यांचे कौतुक केले व गरज पडल्यास आम्ही मदतीसाठी तत्पर राहू असे आश्वासन दिले.

माजी सैनिक संघटना आणि नवभारत मानवतावादी संस्थेच्यावतीने आरोग्य यंत्रणा व पोलिसयंत्रणेचे संघटनेचे विशेषांक देऊन यावेळी अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी बी.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील नायडू हॉस्पीटल मध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेले सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुद्धा मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवॉश देण्यात आले.

यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, कोषाध्यक्ष निरंजन काकडे, अंबादास पालवे तसेच संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सध्या देशावर आलेल्या या संकटाच्या परिस्थितीत माजी सैनिक स्वच्छने सेवा देण्यास तयार आहेत व तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. एकविसाव्या शतकातील ही लढाई शिस्तबध्द पध्दतीने वैद्यकीय तज्ञांच्या दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केल्यास जिंकता येईल. त्यासाठी स्वयंशिस्त, स्वच्छता व संयमाने या विरुध्द प्रत्येकाने सैनिकासारखे लढण्याची आवश्यकता असल्याचे भिलारे यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अखंडपणे काम करत असलेल्या आरोग्य सेवकांचे आभार माजी सैनिकांनी भेट घेऊन मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT