ATM Robbery Case esakal
पुणे

Pune Crime : एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून बँक खातेदारांना गंडा घालणारे अटकेत

एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून बँक खातेदारांचे पैसे लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून बँक खातेदारांचे पैसे लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड, मोबाईल आणि एटीएममध्ये छेडछाड (टेम्परिंग) करण्यासाठी वापरलेली पट्टी असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनी एटीएम मशीनमधून पैसे काढल्याचे पोलिस तपासात कबूल केले आहे.

धर्मेंद्र श्रीशिवलाल सरोज (वय ३०) आणि सोनू कुमार जगदेव सरोज (वय २८, दोघेही रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पैसे काढण्यासाठी आलेल्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तसेच एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून पैसे काढल्याचे अनेक प्रकार शहरात घडले आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.

समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारचा एक गुन्हा घडला आहे. त्या अनुषंगाने देखील आरोपींकडे तपास करण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपींना अटक केली.

असे काढत पैसे -

मशीनमधून ज्या ठिकाणाहून पैसे निघतात तेथे आरोपी एक पट्टी लावत होते. त्यामुळे एखाद्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या खात्यातून पैसे वजा होत. मात्र ते एटीएममधून बाहेर येत नसत. पैसे मशिनमध्येच अडकले आहेत, असे समजून ग्राहक एटीएममधून निघून जात.

ग्राहक निघून गेल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत होते. भारती विद्यापीठ परिसरातील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी धर्मेंद्र सरोज आणि सोनू कुमार सरोज यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT