पुणे

फिंगरप्रिंट मिळू नये म्हणून चोरट्यांनी जाळली एटीएम मशिन

CD

फिंगरप्रिंट मिळू नये म्हणून
चोरट्यांनी जाळले एटीएम

मशीन चोरणाऱ्या चोरट्यांचा नांदेड पोलिसही घेत आहेत शोध

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : विडी घरकूल परिसरातील सग्गम नगरातून शनिवारी (ता. १६) मध्यरात्री एटीएम मशीनच चोरून नेले. त्यात एक लाख ७९ हजार रुपये होते. गाडीत घालून नेलेल्या मशीनमधील पैसे काढून चोरट्यांनी तळेहिप्परगाजवळील शेतात ते फेकून दिले. मात्र, तोडफोड करून चोरट्यांनी मशीन जाळून टाकले. जेणेकरून पोलिसांना फिंगरप्रिंट मिळू नयेत, याची खबरदारी त्यांनी घेतल्याचे पोलिस सांगतात.
एटीएम मशीन चोरणारे चोरटे शेळगी, दहिटणे आडमार्गाने मार्डीच्या दिशेने गेले. त्यानंतर ते पुढे कोठून, कसे मार्गस्थ झाले, याचा शोध लागलेला नाही. तत्पूर्वी, त्या एटीएम केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरदेखील त्यांनी चोरून नेला. चोरट्यांच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांच्या चार पथकांनी मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, बार्शी या तालुक्यांमधील सुमारे ५० गावांमध्ये चौकशी केली. पण, चोरट्यांच्या वाहनाचा पत्ता लागलेला नाही. या चोरट्यांनी पोलिसांना आपण सहजासहजी सापडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच पोलिसांना अजूनही चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
दरम्यान, सोलापूर शहरात ज्या पद्धतीने चोरट्यांनी एटीएम मशीन चोरून नेले, अशीच चोरी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेडमध्येही झाली होती. नांदेड पोलिसांनाही त्या चोरट्यांचा शोध लागलेला नाही. परंतु, चोरटे निश्चितपणे सापडतील, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंनी केली फडणवीसांची मिमिक्री; RJ Malishkaची आठवण, 'मिसिंग लिंक'वरून धारेवर धरलं

तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय! शरद पवारांच्या कृतीने शिवसेना दुखावली, राऊतांनी व्यक्त केली नाराजी

Marathi News Live Updates: नागपुरातील गोंधणीतील खड्ड्यांवरून मनसेचे खड्ड्यात बसून आंदोलन

Farmer Protest: सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा मुद्द्यावर रविकांत तुपकर आक्रमक! शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न; सातबारे भिरकावले..

'बाघाचं पात्र साकारून आता पाठ दुखतेय' तारक मेहतामधील तन्मय वेकारिया म्हणाला, 'मी सरळ उभा सुद्धा राहू शकत नाहीय...'

SCROLL FOR NEXT