pune sakal
पुणे

अत्रेंकडे तलवार अन् स्तुतिसुमनेही होती

इतिहास संशोधक ठाणगे यांचे प्रतिपादन; अत्रे संमेलनाचे सासवडला उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

सासवड : आचार्य अत्रे यांच्याकडे लेखणीची तलवार होती, त्यांनी शब्दांच्या वारांनी दुष्टपणावर घाव घातले, त्यासोबतच मानवतेच्या मंगल भावनांची पूजा बांधणाऱ्यांवर लाखवेळा स्तुतिसुमने उधळली, असे मत प्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक भा. ल. ठाणगे यांनी मांडले. अत्रे व डॉ. आंबेडकर यांनी शिकवण दिल्याप्रमाणे आजकालच्या राज्यकर्त्यांवर अंकुश हवा, असे विचारही त्यांनी मांडले. (Pune News)

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सासवड (ता. पुरंदर) या जन्मगावी कऱ्हेकाठी त्यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने २३ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. १३) झाले. त्याचे उद्घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ठाणगे बोलत होते.

यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश दळवी, माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, सभापती नलिनी लोळे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माणिक झेंडे, शिवाजी कोलते, शांताराम पोमण, कला फडतरे, बंडुकाका जगताप, ख्वाजाभाई बागवान, हेमंत भोंगळे, जगदीश शेवते, शिवाजी घोगरे, दिलीप निरगुडे, शशिकला कोलते, मंजुश्री दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आचार्य अत्रे ही साहित्यिक विचारधारा होती, ती वास्तववादी होती. त्यांच्याभोवती वास्तववाणीचा सुगंध दरवळत होता. शौर्य, भक्ती व नावीन्य शिकवणाऱ्या भूमीत त्यांचा जन्म झाला होता. तिथल्या कऱ्हेकाठच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळावे, हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगून श्री. ठाणगे म्हणाले, आमदार जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज, सरदार गोदाजी जगताप, सिदोजी कोलते यांची त्यांच्या तोलामोलाची स्मारके उभारावीत. जेणेकरुन पुढील पिढ्यांना त्यातून ऊर्मी मिळत राहील. यावेळी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, डॉ. अरुण कोळेकर, डॉ. राजेश दळवी आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक विजय कोलते यांनी केले. सूत्रसंचालन सचिन घोलप यांनी केले. आभार अॅड. प्रकाश खाडे यांनी मानले.

ज्या परिसरात हॉटेलवर मोरीवर भांडी धुण्याचे व वेटरचे काम केले. त्याच अत्रेंच्या भूमीत साहित्य संमेलनाध्यक्ष होईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु, चंदुकाका जगताप, विजय कोलते, अशोक टेकवडे यांनी याच भूमीत मदतीचा हातही दिला. त्यामुळे साहित्य, कला आदी बरीच क्षेत्रे पादाक्रांत करून हा बहुमान मिळाला. कारण माझा जन्म रस्त्यावर झाला.

- भा. ल. ठाणगे, प्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT