Acharya Atre Sakal
पुणे

आचार्य अत्रेंची लेखणी दुष्टांसाठी तलवार अन् मानवतेसाठी स्तुतीसुमने

अत्रे संमेलन उद्घाटन आ. जगताप यांच्या हस्ते संपन्न

सकाळ वृत्तसेवा

सासवड, ता. आचार्य अत्रे (Acharaya Atre) यांच्याकडे लेखणीची (Writing) तलावर झाली होती व शब्दांच्या(Words) वारांनी दुष्टांच्या दुष्टपणावर घाव घातले गेले. तर मानवतेच्या मंगल (Happy) भावनांची पूजाही बांधणाऱयांवर लाख (Lakh) वेळा त्यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यामुळेच आजकालच्या राज्यकर्त्यांवर अत्रे व डाॅ. आंबेडकर (Dr.Ambedkar) यांनी शिकवण दिल्याप्रमाणे अंकुश हवा., असे विचार प्रसिद्ध(Popular) इतिहास (History) संशोधक व साहित्यिक भा. ल. ठाणगे यांनी मांडले.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सासवड (ता. पुरंदर) या जन्मगावी कऱहेकाठी त्यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने 23 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन आज ता. 13 झाले. त्याचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून श्री. ठाणगे बोलत होते. यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परीषद शाखेचे अध्यक्ष प्रकाश खाडे, स्वागताध्यक्ष . राजेश दळवी, माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, सभापती नलीनी लोळे, शिवाजी कोलते, शांताराम पोमण, कला फडतरे, बंडुकाका जगताप, ख्वाजाभाई बागवान, हेमंत भोंगळे, जगदीश शेवते, शिवाजी घोगरे, दिलीप निरगुडे, शशिकला कोलते, मंजुश्री दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आचार्य अत्रे ही साहित्यिक विचारधारा होती, ती वास्तववादी होती. त्यांच्याभोवती वास्तववाणीचा सुगंध दरवळत होता. शौर्य, भक्ती व नाविन्य शिकवणाऱया भूमित त्यांचा जन्म झाला होता. तिथल्या कऱहेकाठच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळावे, हे मी माझे भाग्य समजतो., असे सांगून श्री. ठाणगे म्हणाले., आ. जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज, सरदार गोदाजी जगताप, सिदोजी कोलते यांची त्यांच्या तोलामोलाची स्मारके उभारावीत.जेणेकरुन पुढील पिढ्यांना त्यातून उर्मी मिळत राहील

मोरीवर भांडी धुण्याचे व वेटरचे काम केले. त्याच अत्रेंच्या भूमित साहित्य संमेलनाध्यक्ष होईल, हे स्वप्नातही नव्हते वाटले. परंतु, चंदुकाका जगताप, विजय कोलते, अशोक टेकवडे यांनी याच भूमित मदतीचा हातही दिला. त्यामुळे साहित्य, कला आदी बरीच क्षेत्रे पादाक्रांत करुन हा बहुमान मिळाला. हा आनंद पाहण्यास माझी आई हवी होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT