Atrocity case filed against former corporator for threatening to kill person by using caste abuse esakal
पुणे

Pune Crime: जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल;

एका व्यक्तीस जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रभागातील कामांबाबत तक्रार केल्यामुळे एका व्यक्तीस जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका व्यक्तीने (वय ४०) हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक गणेश बाळासाहेब ढोरे (वय ३५, रा. फुरसुंगी रस्ता, भेकराईनगर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, सागर पोट्रे (वय २६, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव रवींद्रकुमार ढमाले (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांच्याविरुध्द मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी भागातील माजी नगरसेवक ढोरे यांच्या प्रभागातील कामकाजाबाबत एकाने तक्रार केली होती. त्यामुळे ढोरे यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन जातिवाचक शिवीगाळ करून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत तक्रारदाराने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगून तक्रारदारास मारहाण केली. पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Pandey Death : "अबकी बार, मोदी सरकार" या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे निधन; जाहिरात क्षेत्रात शोककळा

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

Latest Marathi News Live Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई, भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

Gaganyaan Mission: ‘गगनयान’चे ९० टक्के विकासकाम पूर्ण

काम देण्याचं आमिष दाखवलं आणि..., लैंगिक अत्याचाराप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, 19 वर्षीय तरुणीसोबत नको ते कृत्य केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT