Atrocity 
पुणे

पीडिता ती अन्‌ फितूरही तीच!

सुनील गाडेकर

पुणे - कोवळ्या वयात झालेल्या अत्याचाराविरोधात ती न्यायाची लढाई लढते. मात्र खटल्यातील विलंबाचा फायदा घेत आरोपींकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडत ती ऐनवेळी साक्ष फिरवते. परिणामी आरोपी मोकाट सुटतात. जिल्हा न्यायालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉस्को) दाखल असलेल्या ३० टक्के खटल्यांचा शेवट अशा पद्धतीने होत आहे. परिणामी न्यायालयाचाही वेळ वाया जात आहे.  

पॉस्को कायद्यानुसार दाखल असलेल्या सुमारे पंधराशे खटल्यांची सुनावणी सध्या येथील न्यायालयात सुरू आहे. 

खटला योग्य प्रकारे चालला तर आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी किंवा नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. मात्र अशा खटल्यांत साक्ष फिरविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तथापि, साक्ष फिरवली तरी आरोपीला शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र त्यासाठी पुरेसे वैद्यकीय पुरावे असणे गरजेचे असते. 

डॉक्‍टरांसमोर दिलेला जबाबदेखील पुराव्यांमध्ये ग्राह्य धरला जातो. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पण मुख्य साक्षीदारानेच पळ काढला तर खटला कमकुवत होतो.

का फिरवली जाते साक्ष?
  आरोपीकडून लग्नाचे आमिष
  बदनामीची भीती
  कुटुंबावर दबाव
  आरोपी नात्यातील असणे
  विविध प्रलोभने
  लग्न टिकावे म्हणून

तक्रार दाखल करतेवेळी आणि खटला सुरू असतानाची परिस्थिती बदललेली असते. निकालास उशीर झाला की फितुरीचे प्रमाण वाढते. त्यासाठी दोन महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करून सहा महिन्यांत निकाल देण्याची प्रक्रिया पाळली गेली पाहिजे.  
- प्रमोद बोंबटकर, सरकारी वकील 

खोटी साक्ष दिली म्हणून संबंधित मुलीच्या कुटुंबीयांवर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, याचा विचार व्हायला हवा. एका खटल्यात लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. शिक्षा होऊ नये म्हणून त्याने पुन्हा लग्नाचे आमिष दिले. त्यामुळे तिने गुन्हा मागे घेतला. मात्र पुन्हा तिच्याबरोबर तोच प्रकार घडला. 
- लीना पाठक, सरकारी वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे पुन्हा CM? पण खरा गेम कोण खेळतोय? गणित थक्क करणारं… २ तारखेनंतरचा ‘राजकीय स्फोट’ खरा की फक्त अफवा?

Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

SCROLL FOR NEXT