Attack on Dog lover at Lake Town Society in Pune 
पुणे

पुण्यात कुत्र्यांच्या त्रासामुळे श्‍वान प्रेमीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास होत असल्याने श्‍वान प्रेमीच्या डोक्‍यात काठीने वार करून त्यांना जखमी केल्याचा प्रकार कात्रज येथील लेकटाऊन सोसायटी येथे घडला. 

विकास अशोक नालवार (वय 39, रा. लेक टाऊन सोसायटी) यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन जगताप, गणेश बिराजदार याच्यासह आणखी एक असे तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (ता. 30) रात्री साडे आठच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. फिर्यादी नालवार हे पाणी प्रेमी असल्याने ते सोसायटीच्या आवारत फिरणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेतात. सोसायटीमध्ये फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे त्यांचे आणि आरोपीचे यापुर्वीही भांडण झाले होते. सोमवारी रात्र पुन्हा त्यांच्यात वाद झाला असता. आरोपींनी त्यांच्या हातावर, डोक्‍यात काठी मारून जखमी केले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक वैशाली भोसले करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंचे खासदार फोडणारा मास्टरमाईंड कोण? समोर आलं मोठं नाव; थेट दिल्ली कनेक्शन, आधी 'शस्त्र विक्रेता' म्हणूनही चर्चेत

Latest Marathi Live Updates: मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा

Shaktipeeth Highway Land Acquisition : अखेर सिंधुदुर्गमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात, कोल्हापूरच्या चंदगडमधून होणार प्रवेश

Satara: खटावला आफ्रिकन चातकाचे आगमन; पडळची ‘ई-बर्ड’ संकेतस्थळावर नोंद; शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा

Naral Barfi: नारळाची बर्फी तर अनेक ठिकाणी मिळते... पण बलरामपूरची चव वेगळी का आहे? जाणून घ्या खासियत

SCROLL FOR NEXT