attack on indapur tehsildar shrikant patil police auction pune crime Sakal
पुणे

Indapur Crime News : इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने केला हल्ला

चालकाच्या अंगावर लाल मिरचीची पावडर टाकून लोखंडी रॉडने शासकीय वाहनाची केली तोडफोडे

संतोष आटोळे

इंदापूर : इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला.

सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून (क्र. MH 42 AX 1661)

आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला.

यावेळी गाडी मध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच उडाली खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT