Beating Sakal
पुणे

महसूल पथकातील तलाठ्यावर १० ते १२ जणांकडून शेवाळवाडी येथे हल्ला

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेले कोलवडी येथील तलाठी राजेश दिवटे यांच्यावर दहा ते बारा वाळूमाफियांनी हल्ला करीत लाथा- बुक्यांनी बेदम मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेले कोलवडी येथील तलाठी राजेश दिवटे यांच्यावर दहा ते बारा वाळूमाफियांनी हल्ला करीत लाथा- बुक्यांनी बेदम मारहाण केली.

मांजरी - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी (Crime) गेलेले कोलवडी येथील तलाठी राजेश दिवटे यांच्यावर दहा ते बारा वाळूमाफियांनी हल्ला (Attack) करीत लाथा- बुक्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. शेवाळवाडी येथे शुक्रवारी (ता. २४) ही घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी हद्दीत चार-पाच अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक उभे आसल्याची माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना मिळाली होती. त्यांनी वाळू माफियांवर कारवाई करण्याचे आदेश महसूल पथकाला दिले होते. त्यानुसार कोलवडी येथील तलाठी राजेश दिवटे यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेवळवाडी परिसरातून अवैद्य वाळूची वाहतूक करणारे ट्रक पकडले होते. ट्रक जप्त करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे घेऊन जात असताना, अवैध वाळू व्यावसायिकांच्या दहा-बारा जणांच्या टोळक्याने रस्त्यातच ट्रक अडवून तलाठी दिवटेंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जप्त केलेल्या दोन ट्रकपैकी एक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तृप्ती कोलते, हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कारवाई करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान घटनास्थळी मांजरी बुद्रुकचे तलाठी योगीराज कनीचे, लोणी काळभोरचे तलाठी दादासाहेब झंजे, थेऊरच्या तलाठी सविता काळे, कोतवाल अविनाश वाघमारे उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT