attack on Two worker with knife in mahalunge company One arrested chakan crime police Sakal
पुणे

Chakan Crime News : महाळुंगेत कंपनीत दोघांवर चाकूने हल्ला; एकाला अटक

कंपनीत कामगारांची मीटिंग चालू असताना कंपनीतील एकाने एकावर चाकूने हल्ला केला त्यावेळी कंपनीतील दुसरी व्यक्ती आरोपी करत असलेला हल्ला रोखण्यासाठी पुढे आली

हरिदास कड ः सकाळ वृत्तसेवा

Chakan News : येथील औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे ता. खेड गावच्या हद्दीतील एका कंपनीत कामगारांची मीटिंग चालू असताना कंपनीतील एकाने एकावर चाकूने हल्ला केला त्यावेळी कंपनीतील दुसरी व्यक्ती आरोपी करत असलेला हल्ला रोखण्यासाठी पुढे आली . या हल्ल्यात कंपनीतील दोघे जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्याप्रकरणी आरोपी अजय अबधाशरण दोहरे, सध्या रा. डोंगरवस्ती, निघोजे,ता. खेड, मूळ रा. बहादुरपूर ता. जि.दातीया, मध्यप्रदेश याला अटक करण्यात आली आहे.अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, "हा प्रकार ता.21 ला सकाळी आठच्या सुमारास सुप्रजित प्रा. लि. या कंपनीत घडला.पोलिसांत फिर्याद सचिन चव्हाण (वय -20 वर्ष, रा. महाळुंगे )यांनी दिली आहे.फिर्यादी चव्हाण हे नेहमीप्रमाणे कामावर आले त्यावेळी सौरभ दुपडे व आरोपी हे देखील कामावर आलेले होते.

त्यानंतर काही वेळात कंपनीच्या क्वालिटी मीटिंग एरियामध्ये क्वालिटी विभागातील कामगारांची मीटिंग चालू असताना अचानक आरोपी दोहरे याने त्याच्या खिशातून चाकू काढला व " कल मुझे गालिया क्यू दी" असे म्हणत चाकू घेऊन मारण्यासाठी धावला.

यावेळी आरोपीने सौरभ दुपडे याच्या गालावर,डाव्या हाताचे दंडावर चाकूने मारून त्याला जखमी केली त्यावेळी फिर्यादी चव्हाण हे दोघांच्या मध्ये पडले. त्यावेळी आरोपीने चाकूने फिर्यादी चव्हाण यांच्या हनुवटीवर व दोन्ही हातावर वार करून त्यांना जखमी केले.

आरोपीपासून वाचण्यासाठी फिर्यादी हे पळत जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या पाठीवर देखील चाकूने वार करून त्यांना जखमी केले आहे.असे फिर्यादित म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT