Attack on a social worker on suspicion of informing the police 
पुणे

पुणे : 'तू आमच्या खबरी पोलिसांना देतो' म्हणत एकावर कोयत्याने वार

सकाळवृत्तसेवा

पुणे: पोलिसांना खबर देत असल्याच्या संशयावरुन सामाजिक कार्यकर्त्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत सामाजिक कार्यकर्ता जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संदीप वामनराव कुंबरे (वय ४३, रा, कोथरूड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहूल रामदास सणस (रा. सुतारदरा) यास अटक केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंबरे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते कोथरूड परिसरात काम करतात. शनिवारी दुपारी सुतारदरा येथील समर्थ मेडीकलजवळून ते त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून "तुला माज आला आहे. तू आमच्या खबरी पोलिसांना देतो, आज तुला खल्लास करतो, "अशी धमकी देत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये कुंबरे यांच्या हाताल व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नागरीकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

महिलेला दम लागत असल्याने नेले जात होते रुग्णालयात पण...

कुंबरे हे पोलिसांना आरोपींची माहिती देत असल्याच्या संशयावरून आरोपींनी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी तत्काळ हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT