पुणे

पुणे पोलिस आयुक्तालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस आयुक्तालयात घेतले पेटवूनच;संबंधित व्यक्ती ९० टक्क्यांहून अधिक भाजली

अश्विनी जाधव-केदारी

पुणे : चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी(ता. 18) दुपारी पोलिस आयुक्तालयात घडली. संबंधिताने हाताची नस कापून घेत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतले. यात तो ९० टक्क्यांहून अधिक भाजला असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. खडकी), असे या व्यक्तीचे नाव आहे. पिंगळे यांनी पेटलेल्या अवस्थेत पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयानजीक असलेल्या मंदिरापर्यंत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी चादर आणि पोत्याच्या साह्याने त्याच्या अंगावरील आग अटोक्यात आणली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पिंगळे हे कुटुंबीयांसह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला आहे. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी एक जुलैला चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला होता. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. दरम्यान, २२ जुलैला नाम साध्यर्मामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणातील दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज ‘व्हेरिफिकेन’साठी पाठविण्यात आला. २७ जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला होता.


चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी पोलिस आयुक्तलयाच्या परिसरातील तक्रार निवारण खिडकीजवळ आले होते. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निराकरण झाले नाही. त्यामुळे विमनस्क अवस्थेत त्यांनी हाताची नस कापून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. पिंगळे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील आणि पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.

''आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पोलिसांना पिंगळे यांनी बॅग सापडली आहे. त्यात ज्वलनशील पदार्थ आणि आगपेटी मिळून आली. पिंगळे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला याचा बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते तपास करत आहे.''
-सागर पाटील, पोलिस उपायुक्त, झोन दोन

''शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येते. मात्र, पोलिस आयुक्तालयासमोर एकाने पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.''
-अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT