पुणे

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

पुणे-  शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकाने पिस्तुलातुन स्वत:वर गोळी घालुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी आठ वाजता लक्ष्मी रस्त्यावरील एका दुकानात घडली. सराफी व्यावसायिकास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 आत्महत्येचा प्रयत्न करणारे सराफी व्यावसायिक 60 वर्षाचे आहेत. त्यांचे लक्ष्मी रस्त्यावर सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. संबंधीत सराफी व्यावसायिक हे नेहमीप्रमाणे मंगळवारी दिवसभर  त्यांच्या दुकानामध्ये होते. दरम्यान, सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी त्यांच्या दुकानातच पिस्तुलातुन छातीवर गोळी झाडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्या दुकानातील कामगारानी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. व्यासायिकावर सध्या उपचार सुरु आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. व्यावसायिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. विश्रामबाग पोलिसांकडुन या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT