Pune Crime news Esakal
पुणे

Pune Crime news: पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; खराडी भागातील धक्कादायक घटना

Pune Crime news: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

मात्र, महिला घरात पळून गेल्याने अनर्थ टळला आहे. पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे व याप्रकरणी आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांमध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि १३ जणांनी येऊन फिर्यादी यांची एक चारचाकी गाडी फोडून नुकसान केले.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

त्याठिकाणी असलेल्या एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने तेथून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT