crime sakal
पुणे

नाचताना खुन्नस दिल्याच्या रागातुन तरुणावर कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न

बुधवारी रात्री कात्रज येथील संतोषनगर परिसरात हि घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

बुधवारी रात्री कात्रज येथील संतोषनगर परिसरात हि घटना घडली.

पुणे - मित्राच्या मुलाच्या वाढदिवस साजरा करून रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या तरुणास नाचताना खुन्नस दिल्याच्या रागातुन कोयत्याने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हि घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जावेद मेहबुब मुल्ला (वय 27), तौफीक लाला शेख (वय 29, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कुलकर्णी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पांडव (वय 19, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र सार्थक कुलकर्णी यांच्यासमवेत त्यांचा मित्र संतोष मोरे यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बुधवारी कात्रज येथील संतोषनगर परिसरात गेले होते.

रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी व सार्थक कुलकर्णी हे दोघेजण संतोषनगर येथील न्यु एकता मित्र मंडळासमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना अडविले, त्यानंतर टोळक्‍यातील एकाने सार्थक यास "तु मला नाचताना खुन्नस का दिली' असा जाब विचारीत त्याच्याकडील कोयत्याने सार्थक कुलकर्णी याच्या डोक्‍यात, पाठीवर व कमरेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतरही आरोपींनी त्यास शिवीगाळ करीत काठी व लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर आरोपींनी त्यांच्या हातातील काठी व कोयते हवेत फिरवून "आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागलास तर खल्लास करुन टाकेन' असे बोलत त्यांनी तेथे दगडफेक केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या रिक्षा,चारचाकी वाहनांच्या काचा कोयत्याने फोडून दहशत निर्माण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT