Crime
Crime Sakal
पुणे

पुणे : व्यवसायातील नफ्याचे पैसे मागितल्याने खुनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे - व्यवसायातील (Business) नफा (Profit) वाटून घेण्याबाबत निश्‍चित झालेले असतानाही एका नागरीकाकडून वेळोवेळी लाखो रुपये (Rupees) घेतले. त्यानंतर व्यक्तीने व्यवसायातील नफा मागितल्याच्या रागातून त्यास नफ्याचे पैसे घेण्यासाठी बोलावून त्याच्यावर चाकूने वार (Knief Attack) करून खुनाचा (Murder) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हि घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता हडपसरमधील सय्यदनगर परिसरात घडला.

सचिन दिलीप होले (वय 34, रा.ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शादाब अमानउल्ला शेख (वय 36, रा.सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख व आरोपी सचिन होले हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. सचिनने शेख व त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी कस्टम येथुन माल घेवुन विक्री करू. त्यातुन मिळणारा नफा वाटून घेऊन असे सांगितले.

व्यवसायासाठी त्याने शेख व त्यांच्या मित्रांकडून वेळोवेळी 29 लाख 90 हजार रूपये घेतले. त्यानंतर शेख यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. दरम्यान, शेख यांनी दिलेले पैसे परत मागितले. तेव्हा होले याने फिर्यादीस व्यवसायातील नफा घेण्यासाठी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता हडपसर येथील सय्यदनगर रेल्वे फाटकाजवळ बोलाविले. तेथे त्यांच्यात वाद झाल्यानंतर होले याने फिर्यादीवर चाकूने वार केले. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT