Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न, पतीला अटक

चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. २७) पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. २७) पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. विश्रांतवाडी पोलिस वसाहत) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी रोहिणी श्यामराव भोकसे- पानसरे (वय ३२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी भोकसे पुणे शहर पोलिस दलात पोलिस कर्मचारी आहेत. त्यांचा पती हर्षद हा रोहिणी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करीत होता. हर्षद आणि रोहिणी यांच्यात पुन्हा शनिवारी वाद झाला. त्यावेळी पतीने रोहिणी यांचा गळा आणि तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच, मारहाण करून सोशल मीडियावर बदनामीकारक संदेश पाठविण्याची धमकी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : अपात्रतेच्या कारवाईचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर, चिन्हांचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकेल - CJI

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT