पुणे

नारायणगाव : खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : युट्युब चॅनेलच्या पत्रकारांवर नारायणगाव पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांना देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करून सत्य शोधून काढले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. पुरावा नसेल, तर खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपींचे नाव कमी करण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जुन्नर येथे पत्रकारांना दिली.

जुन्नर टाइम्स युट्यूब चॅनलचे संपादक संदीप उतरडे व त्याचे सहकारी पत्रकार सचिन जाधव-मोरे (पूर्ण नाव माहीत नाही) व एक अनोळखी व्यक्ती आशा चार जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. उतरडे याला अटक केली असून, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल झालेले मोरे याने आज सकाळी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास करणे, ही बाब न्याय प्रविष्ट असताना काही राजकीय व्यक्तींनी या घटनेत आपले राजकीय उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान आज शांतता कमिटीच्या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे जुन्नर येथे आले होते. यावेळी या प्रकरणाबाबत पत्रकरांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, की फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होणे, ही प्रक्रिया आहे. गुन्हा व्यवस्थित दाखल केला आहे का, याची चौकशी उपविभागीय अधिकारी खन्ना करतील. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात होईल. तपासाचा उद्देश खरे शोधून काढणे हा असतो. पुरावा नसेल, तर गुन्ह्यातून आरोपींचे नाव कमी करण्यात येते. या प्रकरणाचा सखोल तपास होईल. कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही या वेळी पाटील यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT