Dilip Valse Patil Sakal
पुणे

भोंग्याच्या अडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न - वळसे

भोंगे लावले अथवा काढले तर बे रोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का.भोंग्याच्या अडून राज्यात अशांतात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रवींद्र पाटे

भोंगे लावले अथवा काढले तर बे रोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का.भोंग्याच्या अडून राज्यात अशांतात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नारायणगाव - भोंगे (Loudspeaker) लावले अथवा काढले तर बे रोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? भोंग्याच्या अडून राज्यात अशांतता (Unrest) निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अशांतता निर्माण करून हे सरकार कसे जाईल, कसे हलवता येईल यासाठी विरोधकांचे कारस्थान सुरु आहेत. अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Valse Patil) पाटील यांनी केली.

खोडद(ता. जुन्नर) येथील श्री आंबिका पतसंस्थेच्या श्री आंबिका सहकार भवन या नूतन इमारतीचे उदघाटन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. या वेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे,सभापती देवदत्त निकम, गुलाबराव नेहेरकर, विनायक तांबे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, सरपंच मनीषा गुळवे, पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश खरमाळे, सचिव शिवाजी खरमाळे, संचालक शैलेश गायकवाड, संतोष पटाडे, रोहिदास गायकवाड, बजरंग खरमाळे, विठ्ठल पानमंद, सर्जेराव कुचिक, प्रकाश गायकवाड, संदीप गुळवे, सीमा थोरात, संगीता गायकवाड, विद्या गायकवाड, दिलीप गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकर आदी उपस्थित होते.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार राज्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.कोरोना संकटाचा सामना राज्य शासनाने सक्षमपणे केला आहे. मात्र दुर्दैवाने विरोधक वाढलेली महागाई, इंधन दरवाढ,बेरोजगारी , देशात काँग्रेसने उभारलेले महत्वाचे प्रकल्प विक्री करण्याचे केंद्र शासनाने धोरण, देशाचे विकासाचे धोरण या बाबत न बोलता राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात राजकारण केलं जातं आहे.भोंगा महत्वाचा नाही.

मात्र, भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी दहा या वेळेत भोंगा वाजवण्यास निर्बंध आहेत. त्या नुसार कार्यवाही झाल्यास प्रवचन, कीर्तन, काकड आरती, जागरण गोंधळ आदी. देवाचे कार्यक्रमांचे काय असा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या सहकार धोरणावर टीका करताना वळसे पाटील म्हणाले स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी राज्यात सहकार चळवळ उभी केली. या माध्यमातून दूध संस्था, विकास सोसायट्या, अर्बन बँक, साखर कारखाने, पतसंस्था , बाजार समित्या निर्माण झाल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले आहे. निर्बंध लादून या सहकार चळवळ अडचणीत आणण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. वळसे पाटील म्हणाले, श्री अंबिका पतसंस्थेने सचोटी व प्रामाणिक पणाने काम केल्याने १९९१ साली स्थापन झालेल्या या संस्थेने प्रगती केली असून संस्थेच्या ९ शाखा कार्यरत असून १२५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

आमदार बेनके म्हणाले तालुक्यातील टॉप टेन पतसंस्थेत श्री अंबिका पतसंस्थेचा समावेश आहे. येथील श्री जगदंबा माता देवस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी व ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्ते, पूल, बंधारा दुरुस्ती आदी विकास कामांसाठी निधी दिला जाईल. पतसंस्थेचे अध्यक्ष गायकवाड म्हणाले पतसंस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, फळझाडांच्या रोपांचे वाटप आदी समाजउपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. पतसंस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खोडद गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, क्रीडांगण, मीना नदीवरील पूल, बंधारा दुरुस्ती आदी साठी निधी मिळावा.सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे.

सूत्रसंचालन जालिंदर डोंगरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT