Attendance of all political leaders Maha Aarti ncp Atul Benke junnar sakal
पुणे

महाआरतीला सर्व राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थितीती - अतुल बेनके

राज्याने शिवजन्मभूमीचा आदर्श घ्यावा: आमदार बेनके

रवींद्र पाटे

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्व राजकिय पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे वाचन व महाआरती करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसार आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये. तालुक्यात जातीय तणाव निर्माण होणार नाही.याची काळजी घ्यावी.असे आवाहन या वेळी आमदार अतुल बेनके यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, साईनाथ ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे वाचन व महाआरतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आमदार बेनके यांच्यासह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्याना पाटे यांनी निमंत्रित केले होते. आमदार बेनके, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे वाचन करून महाआरती करण्यात आली.या वेळी युवा नेते अमित बेनके, सुजित खैरे,रामदास अभंग, गणेश वाजगे,मुकेश वाजगे, सागर दंरदळे, मुस्लिम समाजाचे तोषिब कुरेशी, जुबेर शेख, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख संगीत अडसरे, भाजपचे नामदेव अण्णा खैरे, प्रतीक जाधव,हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.शिवदास तांबे, शैलेश औटी आदी उपस्थित होते.या वेळी आमदार बेनके म्हणाले भोंगा प्रश्नावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सर्व राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्याना एकत्र घेऊन हनुमान चालीसाचे वाचन करून महाआरती केली.

या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील प्रतिनिधीनी सुध्दा उपस्थित होते. या वेळी आमदार बेनके म्हणाले तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने रहात आहेत. जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवजन्मभूमीत जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करू.प्रत्येक पक्षाचे राजकिय विचार वेगळे जरी असले तरी पक्षाचा अजेंठा पुढे घेऊन जात असताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.आजच्या या कार्यक्रमातुन शिवजन्मभूमीने राज्याला आदर्श घालून दिला आहे.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसाद वाटप करून महाआरतीची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT