पुणे

ऑनलाइन वर्गातही विद्यार्थ्यांवर लक्ष

ब्रिजमोहन पाटील -सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन शिक्षण देण्याची शिक्षण संस्थांची तयारी सुरू आहे, पण मुलांना समजले किती? हा प्रश्न निर्माण होत आहे. हे शिक्षण केवळ एकतर्फी न होता, त्यात मुलांनाही संवाद साधता यावा तसेच त्याला किती समजले आहे, हे कळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘ऑनलाइन मॅनेजमेंट सिस्टिम’ विकसित केली जात आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किती समजले, यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

कोरोनामुळे प्रत्यक्षात महाविद्यालय, विद्यापीठातील विभाग कधी सुरू होतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण शिक्षण देताना एकाच वेळी वर्गात सर्व विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. काही जणांना थेट वर्गात तर काहींना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ग वगळता इतर वर्षांचे अध्यापन १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. 

ऑनलाइन शिक्षण म्हटले, की त्यात शिक्षकांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, ऑडिओ किंवा ऑनलाइन लेक्‍चर एवढाच भाग सध्या येत आहे. ही प्रक्रिया संवादात्मक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेले किती समजले? हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाइन वर्गातून लेफ्ट होतात. कधी तर मध्येच सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाने किमान ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून विद्यापीठात काम सुरू केले आहे. विविध विषयांचे प्राध्यापक ‘इ कंटेंट’ निर्मितीच्या कामात आहेत. तसेच ‘ऑनलाइन मॅनेजमेंट सिस्टिम’ विकसित करण्यासाठी तज्ज्ञांना यामध्ये सहभागी करून घेतले गेले आहे.  

ऑनलाइनचा कंटेंट संवादात्मक असला पाहिजे. विद्यार्थ्यांना किती समजले हे करण्यासाठी त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता भाग, किती समजला हेसुद्धा लक्षात येईल. तसेच ग्रामीण भागात कमी रेंज असली तरी विद्यार्थ्यांना शिकता आले पाहिजे, या दृष्टीने आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ. 
 

क्‍लास रूमचा फिल 
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना त्यात त्यांचे मन लागले पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ तयार करताना त्यात वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारणे, प्रश्न सोडवून घेणे, त्याची उत्तरे सांगून ते बरोबर आहेत की नाही हे तपासणे याचाही अंतर्भाव त्यात असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण थेट वर्गात आहोत, याचा फिल येऊ शकणार आहे. 

विद्यार्थ्यांचा सहभाग कळणार
‘ऑनलाइन मॅनेजमेंट सिस्टिम‘ मध्ये केवळ व्हिडिओ अपलोड केले आणि संपले असे नाही, तर विद्यार्थ्याने ते व्हिडिओ किती वेळ पाहिला, त्याने प्रश्न विचारले का? उत्तर दिले का? यावरदेखील लक्ष असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा त्यात किती सहभाग होता हे प्राध्यापकांना कळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सिल्लोडच्या अंभई गटात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव विजयी

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT