पुणे

अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

CD

बारामती, ता. ५ ः लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता बारामतीकरांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
बारामतीत केलेल्या विकास कामांच्या मुद्यांवर व इतर विधानसभा मतदारसंघात बारामतीप्रमाणेच विकास करून दाखविण्याची ग्वाही देत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे सूत्र ठेवले होते. बारामतीसह इंदापूर, दौंड व खडकवासला या चार मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळेल, अशी खात्री अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.
बारामतीची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज वर्तविला गेला होता. प्रत्यक्षात सुप्रिया सुळे यांनी एक लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळवत ही चुरशीची निवडणूक नव्हती, हेच सिद्ध केले. शरद पवार नावाचा करिष्मा बारामतीतच नव्हे तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आजही कायम आहे, 84 वर्षांच्या या नेत्याने या निवडणुकीत केलेली पक्षबांधणी दाखविलेला धीर, बांधलेली मोट पाहून मतदारांनाही आपले मत त्यांच्या पारड्यात टाकले.
या पराभवानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बारामतीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सुनेत्रा पवार यांना बारामतीतून मताधिक्य मिळेल असा अंदाज त्यांनी केलेला होता, प्रत्यक्षात खडकवासला वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघांनी सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देत हा अंदाज चुकीचा ठरविला.
सुळे यांचा चौथ्यांदा बारामतीतून लाखांच्या पेक्षा अधिक मताधिक्याने विजय झाला. बारामतीच नव्हे तर इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर या सर्वच मतदारसंघातून सुळे यांना पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य मिळत गेले ही बाब महत्त्वाची म्हणावी लागेल.
इंदापूरमध्ये दत्तात्रेय भरणे, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, दौंडमध्ये राहुल कुल, रमेश थोरात, वासुदेव काळे यांसारखे दिग्गज असतानाही मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही ही बाब यानिमित्ताने समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Rule: पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय! गुंतवणूक नियमांमध्ये मोठे बदल, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, कसा फायदा होणार?

IPL 2026 Auction पूर्वी भारतीय गोलंदाजाची शैली वादात; फ्रँचायझीने पैसा लावण्यापूर्वी करावा विचार, त्याच्यावर बंदीची टांगती तलवार...

Navi Mumbai Airport: फ्लाइट सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई विमानतळावर घुसखोरी; एकाला अटक, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: कोपरगावच्या समता नागरी पतसंस्थेवर गंभीर आरोप, ईडी चौकशीची मागणी

Satara Drug Bust : साताऱ्यात खळबळ! सावरीतील शेडवजा फॅक्टरीत १५ कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त, मुंबई पोलिसांची गुप्त कारवाई

SCROLL FOR NEXT