भीमाशंकर मंदिरात तिरंग्याची आकर्षक सजावट  sakal
पुणे

भीमाशंकर मंदिरात तिरंग्याची आकर्षक सजावट

कोरोनाच्या संकटामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : श्री क्षेत्र भीमाशंकर (bhimashankar) येथे दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने देवस्थानच्या वतीने गाभाऱ्यात पहाटे ५ वाजता शिवलिंगाची विधिवत पूजा संपन्न झाली. शिवलिंगावर भारताच्या तिरंगी ध्वजाच्या तीन रंगांच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या घरातूनच शिवशंकराची पूजा-आराधना करून मंदिर देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यात अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतू मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील कोरोना व झिका व्हायरसचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असून अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही.

घोडेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने पालखेवाडी व डिंभे येथे चेकपोस्टवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांनी व पर्यटकांनी भीमाशंकर परिसरात येऊ नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबा भाविकांना मारहाण प्रकरणी परिते गाव आणि व्यापार पेठ बंद

Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

SCROLL FOR NEXT