Ranjangav-Ganpati 
पुणे

रांजणगावच्या महागणपतीला आकर्षक सुवर्णालंकार व फुलांची सजावट 

सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे - रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आज चतुर्थीनिमित्त अष्टविनायक महागणपतीला आकर्षक सुवर्णालंकार व फुलांची सजावट करण्यात आली होती. 

कोरोनामुळे नागरिकांना दर्शनासाठी मंदिर बंद असले तरी श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थानतर्फे दैनंदिन पूजा व धार्मिक विधी चालू असून, आज चतुर्थीनिमित्त सोशल मीडियावर नागरिकांनी महागणपतीचे आकर्षक व देखणे रूप पाहून समाधान व्यक्त केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रस्टतर्फे चतुर्थीनिमित्त पहाटे महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

यावेळी ट्रष्टचे विश्वस्त डॉ. संतोष दूंडे, प्रा. नारायण पाचुंदकर व ऍड. विजयराज दरेकर तशेच व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे, पुजारी मकरंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार अष्टविनायक महागणपतीचे मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद असल्याने, मंदिर परिसरातील दुकानदार व व्यावसायिकावर मोठा परिणाम झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT