हडपसर : काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग साकारले आहे. sakal
पुणे

हडपसर : नाण्यांपासून बनवले आकर्षक शिवलिंग

२२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला

कृष्णकांत कोबल

हडपसर : काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातीलही अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे.

दीपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनेमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. शिवलिंग प्रतिमा त्याला कायम मोहीत करते. आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं करावे, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग आकारास आणले. गेली वर्षभरापासून परिसरात या शिवलिंगाची चर्चा सुरू आहे. अनेक नागरिक अवर्जुन ते पाहण्यासाठी घोलप यांच्या घरी जात आहेत.

दृष्टीक्षेपात शिवलिंग

एकूण नाणी : २२ हजार ३०१

दोन रुपयांची नाणी : १४ हजार ९१६

पाच रुपयांची नाणी : ४ हजार ८७५

दहा रुपयांची नाणी : २ हजार ५१०

एकूण रूपये : ७९ हजार ३०१

दीपक म्हणाला, "माझी मोबाईल शॉपी आहे. कामा व्यतिरिक्त मी इतर कोणताही छंद जोपासलेला नाही. मी शिवाचा भक्त असल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी म्हणून दररोज शिवालयात जातो. जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असे शिवलिंग बनविण्याचा माझा मानस होता. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल, असा विचार करून चार महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनविता आले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT