property tax esakal
पुणे

Property Tax : मिळकतकर थकविणाऱ्या २०० मिळकतींचा लिलाव

मिळकतकर थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने महापालिकेतर्फे अशा मिळकती सील केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मिळकतकर थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने महापालिकेतर्फे अशा मिळकती सील केल्या आहेत. तरीही जागा मालक पैसे भरत नसल्याने या मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १ हजार ६१८ मिळकतीपैकी २०० मोठ्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे.

पुणे महापालिकेचा खर्चाचा डोंगर वाढत असताना त्यासाठी उत्पन्नाची बाजू भक्कम करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामध्ये बांधकाम विकसन शुल्क, जीएसटीचा परतावा आणि मिळकतकर हे तीन प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात मिळतकरातून २४०० कोटीचे उत्पन्न अपेक्षीत आहे. त्यापैकी १४०० कोटी आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यातील प्रमुख हिस्सा हा निवासी मिळकतींचा आहे. अनिवासी मिळकतींमधूनही उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे जे जागा मालक कर भरत नाहीत, अशा थकबाकीदारांना नोटीस पाठवून त्यांच्या मिळकती सील केल्या जात आहेत.

ज्यांनी थकबाकी भरली त्यांचे सील काढण्यात आले आहे. पण जे नागरिक थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या मिळकती लिलावात काढून त्यातून थकबाकीची रक्कम वसूल केले जाणार आहे.

लिलावात मिळणाऱ्या रकमेतून थकबाकी वसूल केली जाते व उर्वरित रक्कम ही संबंधित जागा मालकास दिली जाते. महापालिकेने आत्तापर्यंत १ हजार ६१८ मिळकती सील केल्या असून, ९६ कोटी २७ लाख ९१८ रुपये इतकी थकीत रक्कम आहे.

मोक्याच्या व मोठ्या रकमेच्या मिळकतींचा लिलाव

महापालिका प्रशासनाने १ हजार ६१८ मिळकती सील केल्या असल्या तरी या सर्वच मिळकती लगेच लिलावात येणार नाहीत. मुख्य रस्त्यावर, महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या व ज्यांचे न्यायालयीन वाद नाही अशा ज्या मिळकतींना लिलावात प्रधान्य दिले जाणार आहे. यासाठीची मिळकतीचे मूल्यांकन करणे, संबंधित जागा मालकास नोटीस पाठवणे, जाहीर प्रकटन देणे यासह इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा लिलाव केला जाणार आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लिलावाची प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी मिळकतकर विभागातर्फे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली आहे. यासंदर्भात महापालिकेत आज एक बैठक झाली आहे. यामध्ये लिलावाचा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चीत केला आहे.

‘मिळकतकर विभागाने १६१८ मिळकती सील केल्या आहेत, त्यापैकी २०० मिळकतींचा पहिल्या टप्प्यात लिलाव केला जाणार आहे. याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT