nitin gadkari 
पुणे

भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसविण्यास आक्षेप

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला नोटीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

गडकरी यांनी एका कार्यक्रमात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजासंबंधी नियमांमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोटार वाहन उत्पादक कंपन्यांना हॉर्नच्या संगीतमय आवाजाबद्दल निर्देश देण्यात येणार आहेत. मात्र, कुठलेही नवीन धोरण, कल्पना विज्ञानाधारित असावी, अशी भूमिका घेत डॉ. कल्याणी मांडके यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई यांच्यामार्फत संबंधित मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

आवाजासंबंधीची ही कल्पना नावीन्यपूर्ण आणि रंजक वाटत असली तरी त्याबद्दल सर्वकष विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यात नमूद केले आहे. हॉर्न हा रस्त्यावरील इतर वाहने, पायी चालणारी माणसे यांना सावध करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी असतो. हॉर्नचा आवाज हा ऐकण्याचा संकेत असून, ऐकण्याची कमी-अधिक क्षमता असणाऱ्या सर्वांनाच ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरींमध्ये असतो. तसेच त्याची तीव्रता देखील विशिष्ट पातळीची असायला हवी, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

SCROLL FOR NEXT