पुणे

1 ऑगस्ट हा मराठी दिन म्हणून साजरा करावा - डॉ श्रीमंत कोकाटे

आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे.

मोहिनी मोहिते

आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे.

कॅन्टोन्मेंट - आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांच्या मराठी साहित्यतील योगदान पाहता 1 ऑगस्ट हा मराठी दिन म्हणून साजरा करावा अशी भावना डॉ श्रीमंत कोकाटे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त पूर्वसंध्येला डॉ. कोकाटे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

स्व. ठाकरे कलादालन, सारसबाग याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन चांगले गुण मिळवणाऱ्या १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थाचा सत्कार संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बागवे म्हणाले की, अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी समाज कार्य केले पाहिजे व जीवनात कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असली तरीही संघर्ष करून पुढे जाण्याचे सामर्थ्य अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून घ्यावे असे आव्हान रमेश बागवे यांनी सर्व विद्यार्थांना केले.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी नगरसेवक अविनाश बागवे, या कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी मातंग समाज चे ज्येष्ठ नेते यादवराव सोनावणे , डॉ सुहास नाईक, विठ्ठल गायकवाड, महिला आघडीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे , संजय साठे , दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, रोहित अवचीते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT