Aundh Tree Collapse sakal
पुणे

Tree Collapse : औंधरस्ता बोपोडी परिसरात झाडे पडून नुकसान

औंध, औंधरस्ता, खडकी रस्ता, बोपोडी, पाषाण, महाळुंगे, सूस, सुतारवाडी परिसरात आज गारा व वा-यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

औंध - औंध, औंधरस्ता, खडकी रस्ता, बोपोडी, पाषाण, महाळुंगे, सूस, सुतारवाडी परिसरात आज गारा व वा-यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. तर काही ठिकाणी बराच काळ वाहतूक कोंडी झाली.

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमध्ये ब्रेमेन चौक, बोपोडी चौक, भाले चौक, आयटीआय रस्ता याठिकाणी निर्माण झालेले अडथळे दुर करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. औंध येथील डीपी रस्त्यावरील शारदा अपार्टमेंट, ॲल़ोमा काउंटी, औंध-बाणेर लिंक रस्त्यावर काही ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. मनपाच्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने तातडीने याठिकाणी रस्ता मोकळा करण्यात आला.

खडकी औंध रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील पिंपळाचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे ब्रेमन चौकाकडून खडकी स्टेशनकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला. तर पाषाण-सूस रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागली.

अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार औंध, खडकी व बोपोडी भागात एकूण २५ झाडे पडल्याच्या घटना घडल्याची नोंद झाली. यामध्ये काही ठिकाणी वाहनांवर तर काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Pune Air Pollution: पुण्याच्या हवेत तासाला मिसळते ६ टन सिमेंट; आरोग्यासाठी गंभीर धोका

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचे अडकलेले हफ्ते लवकरच खात्यात जमा होणार; महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय, पण कोणता?

उड्डाणानंतर हवेतच विमानाचं इंजिन फेल, १५० प्रवाशांचा जीव टांगणीला; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांत, कोल्हापुरात पुन्हा राजकीय धुरळा उडणार

SCROLL FOR NEXT