पुणे

‘घन ओथंबून येती’ काव्यमैफल उत्साहात

CD

औंध, ता. ५ : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कवयित्री बहिणाबाई चौधरी वाङ्मय मंडळ तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विभागांच्या वतीने काव्य सादरीकरण स्पर्धा व ‘घन ओथंबून येती’ काव्यमैफल नुकतीच पार पडली. यात पावसाळी भावविश्‍व, निसर्ग आणि मानवी भावनांना शब्दरूप देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांनी काव्यमैफलीत रंगत आणली.
स्नेहवर्धन प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषविले. काव्यरसिक मंजिरी एंडाईत व डॉ. सचिन चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. तावरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काव्य सादरीकरणातील विविध सौंदर्यपैलू उलगडून दाखविले. आचार्य मम्मट यांच्या काव्यशास्त्राचा संदर्भ देत त्यांनी ‘कांतासंमित उपदेश’ ही संकल्पना स्पष्ट केली. ‘‘कविता ही प्रियतमेच्या मृदू आणि प्रभावी उपदेशाप्रमाणे मनाचा ठाव घेणारी असते,’’ असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रतीक भांगरे याने प्रथम, मानसी बनसोडे हिने द्वितीय, तर तृप्ती शिगवणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. भारती धानवे व अजय थेरवडकर यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ (प्रथम व द्वितीय) क्रमांक पटकाविला. प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. डॉ. सविता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कृष्णा घोलप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ऐश्‍वर्या कुंभार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! यंदाची दहीहंडी तिने गाजवली; गौतमी पाटील नाही मग ही नवी डान्सर आहे तरी कोण?

Marathi News Live Updates: एक हजार शाळा मॉडेल स्कूल करण्याचं उद्दिष्ट- सुनेत्रा पवार

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

SCROLL FOR NEXT