Auto Expo 2022 Sakal
पुणे

ऑटो एक्स्पोला उद्या प्रारंभ; मनपसंत कार व बाइक निवडण्याची संधी

नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्यानिमित्ताने स्वप्नातील गाडी आपल्या घरी यावी, असे प्रत्येकालाच वाटते.

सकाळ वृत्तसेवा

नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्यानिमित्ताने स्वप्नातील गाडी आपल्या घरी यावी, असे प्रत्येकालाच वाटते.

पुणे - नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्यानिमित्ताने स्वप्नातील गाडी आपल्या घरी यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. २४) व रविवारी (ता. २५) भव्य ‘ऑटो एक्स्पो २०२२’चे आयोजन केले आहे. ई- बाईक आणि कारचे मुबलक पर्याय नागरिकांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.

कार किंवा बाईक घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा हजारो प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात, तेव्हा खऱ्याअर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ऑटो एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. बजेटनुसार गाडी घेणाऱ्यांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, याठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि बाईक, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. एवढंच नाही तर या एक्स्पोमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेईकलचेही असंख्य पर्याय पाहायला मिळतील.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे हा दोन दिवसांचा ऑटो एक्‍स्पो होणार असून बजेट कार्स, सेडान कार्स, हॅचबॅक कार्स, एसयुव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार्स, बाइक्स अशा कितीतरी गाड्यांची माहिती मिळणार आहे. नव्याने लाँच झालेल्या गाड्याही येथे पाहायला मिळतील. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही येथे उपलब्ध आहेत. त्यांच्या ‘ईएमआय’संबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरेही ग्राहकांना याठिकाणी मिळणार आहेत. हा एक्‍स्पो सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

सकाळ ऑटो एक्स्पो २०२२

कुठे : पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर

कधी : २४ आणि २५ सप्टेंबर

वेळ : सकाळी १० ते रात्री ८

सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT