पुणे

अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा हवीये? 'इथं' मिळतीये सुविधा

सागर कुलकर्णी

पर्वती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात डॉक्टर,नर्स ,पोलिस, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार हे प्रयत्न करीत आहेत. शहरात लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा चालू आहेत. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्याचे काम दांडेकर पूलाजवळील झोपडपट्टीत राहणारे रिक्षाचालक संदीप काळे हे करीत आहेत.

संपूर्ण पुणे शहरात ते मोफत रिक्षा देण्याचे काम गेल्या सहा दिवसांपासून करीत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क रिक्षाचालक घेत नाहीत.पाच सहा वर्षांपासून पुणे शहरात रिक्षा चालवण्याचा काम ते करीत आहेत.आपल्या गावी बीडला न जाता ते मोफत रिक्षा देण्याचे काम करीत आहेत. पुणे शहरात कोरोनाविरूध्दच्या लढाईत नागरिक मदतीसाठी पुढे येत असताना संदीप काळे आपल्या मोफत रिक्षा प्रवासाने मदत करीत आहेत. या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावरच्या ठिकाणावर जाण्यासाठी वाहन भेटत नाही‌.यावेळी संदीप काळे आपल्या रिक्षातून त्यांना पोहाचविण्यासाठी मदत करतात.

सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ते हे काम करत असतात. मोफत प्रवासी वाहतूक करण्यासाठी त्यांनी परवानादेखील काढलेला आहे. प्रवासी नेताना ते काळजीही घेत असतात. संदीप काळे यांनी सांगितले, की अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. माझ्या रिक्षातून त्यांना कामावर नेण्याचे काम करतो. कुणालाही गरज भासल्यास दांडेकर पुलाजवळील माझी रिक्षा असते.

आम्हाला रोज घरून कामावर जाण्यासाठी संदीप दादा त्यांच्या रिक्षातून सोडतात. त्यांचे खूप धन्यवाद, असे परिचारिका संघर्षिका वाघमारे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT