पुणे

प्रवासासाठी रेल्वेचे ‘वेटिंग’ संपणार पुणे- भिगवण दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारणार

CD

पुणे, ता. ८ ः पुणे ते भिगवण दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना आता मार्ग उपलब्ध होण्यासाठी थांबावे लागणार नाही. कारण जानेवारीपासून या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेच्या (ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम कामास सुरुवात होणार आहे. यासाठी सुमारे १२३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे ते भिगवण दरम्यान १०३ किलोमीटरचे अंतर असून, प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर सिग्नल यंत्रणा असणार आहे. अप आणि डाऊन असे मिळून प्रत्येक किलोमीटरला सिग्नलचे दोन खांब असतील. या नव्या यंत्रणेमुळे पुणे ते भिगवण दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ‘सेक्शन’ मोकळा होण्याची वाट पहावी लागणार नाही. परिणामी या लोहमार्गाची रेल्वे वहन क्षमता वाढेल. शिवाय गाड्यांना थांबावे लागणार नसल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
रेल्वे बोर्डाने पुणे ते भिगवण व भिगवण ते वाडी स्थानकादरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणेला मंजुरी दिली. याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून, जानेवारी २७ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. एक वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या यंत्रणेमुळे लोहमार्गाची क्षमता वाढेल. परिणामी एकाच वेळी एकामागून एक अनेक गाड्या कमी अंतरावर सुरक्षितपणे चालवता येईल. गाड्यांना होणारा विलंब कमी होईल, गाड्यांना थांबावे लागणार नाही. परिणामी प्रवासाचा वेळ वाचेल.
--------------
स्वयंचलित सिग्नल यंत्रणा म्हणजे काय?
- या प्रणालीमध्ये सिग्नल स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केले जातात, ते रेल्वे गाडीच्या स्थितीनुसार बदलत राहतात.
- सिग्नल बदलण्यासाठी स्टेशन मास्तर किंवा मानवी हस्तक्षेपाची फारशी गरज नाही.
- या प्रणालीत रेल्वे मार्गाचे एक किलोमीटर अंतराचे लहान भाग केले जातात, ज्यांना ब्लॉक सेक्शन म्हणतात.
- प्रत्येक ब्लॉक सेक्शनमध्ये रेल्वेची स्थिती जाणण्यासाठी ट्रॅक सर्किट किंवा ॲक्सल काउंटर वापरले जातात.
- रेल्वे एक किलोमीटरचे अंतर पार करताच, तेथील सिग्नल हिरवा होतो.
-परिणामी मागून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला तत्काळ मार्ग उपलब्ध होतो.
-------------------
सध्या ‘अबसोल्यूट ब्लॉक सिग्नलिंग’ :
सध्या पुणे ते भिगवण मार्गावर अबसोल्यूट ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली आहे.
- यात दोन स्थानकादरम्यान एका दिशेने केवळ एकच रेल्वे धावते.
- ती रेल्वे जोपर्यंत पुढच्या स्थानकाच्या पुढे जात नाही. तोपर्यंत पाठीमागून दुसरी रेल्वे सोडली जात नाही.
- परिणामी रेल्वे गाड्या उशिराने धावतात.
- मार्ग उपलब्ध होण्यासाठी वाट पहावी लागते.
----------------
‘‘स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे मार्गाची क्षमता वाढेल. याचा सर्वाधिक फायदा गर्दीच्या हंगामात जेव्हा रेल्वे गाड्यांची संख्या वाढते. त्यावेळी गाड्यांचे संचलन वेळेवर करण्यासाठी होणार आहे. यामुळे गाड्यांची संख्या वाढण्यास देखील मदत होईल.
-हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
----------
‘‘पुणे ते भिगवण दरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना सेक्शन उपलब्ध होण्यासाठी रेल्वे पुढील स्थानकापर्यंत पोचण्याची वाट पहावी लागणार नाही. परिणामी प्रवासी व मालगाड्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. रेल्वेगाड्यांचे संचालन सुरक्षित होण्यासही मदत होईल. रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल.
-कनिष्क बोकेफोडे, रेल्वे अभ्यासक, पुणे
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT