Pune Rains sakal
पुणे

Pune Rain Updates : पहिल्या दहा दिवसातच सरासरीच्या निम्मा पाऊस; पुणे शहरात सर्वाधिक २०१ मिलिमिटरची नोंद

पुणे शहर व जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या दहा दिवसांतच या महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस झाला आहे. यानुसार १० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८.९० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या दहा दिवसांतच या महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस झाला आहे. यानुसार १० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८.९० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१.६ मिलिमिटर पाऊस पुणे शहरात पडला आहे.

जून महिन्याचा शहर व जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस हा १७६.२ मिलिमीटर आहे. यापैकी आतापर्यंत प्रत्यक्षात ८८.९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ५०.५ टक्के झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी १ जूनपासून पडलेल्या पावसाच्या दैनंदिन नोंद केली जाते. यानुसार तालुका व महिनानिहाय एकूण सरासरी पाऊस, प्रत्यक्षात झालेला पाऊस आणि एकूण सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस टक्केवारीत नोंदला जातो.

दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक १५०.३ मिलिमिटर पाऊस इंदापूर तालुक्यात पडला असून, सर्वांत कमी म्हणजे केवळ २७ मिलिमिटर पाऊस जुन्नर तालुक्यात नोंदला गेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या आठवड्यातील ४ तारखेपर्यंत कुठेही पाऊस पडला नव्हता. ५ जूनपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून, या महिन्यातील पहिल्या आठवड्यातील अवघ्या पाचच दिवसांत जून महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस नोंदला गेला असल्याचे सोमवारी (ता.१०) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुका पाऊस मि.मी टक्केवारी

पुणे शहर २०१.६ १३१.९

हवेली ११०.५ ६३.००

मुळशी ६५.१ २३.४

भोर १०४.२ ५०.७

मावळ ४२.८ १९.१

वेल्हे ९०.८ १९.५

जुन्नर २७ो २३.४

खेड ४४.९ ३५.३

आंबेगाव ५०.६ ३७.७

शिरूर ७८ ८६.६

बारामती १४७.९ १६९.८

इंदापूर १५०.३ १४७.२

दौंड ११०.५ ११६.९

पुरंदर ७१.९ ६४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT