Avinash Dharmadhikari statement country needs to know history of Marathas sakal
पुणे

‘मराठ्यांचा इतिहास देशाला कळण्याची गरज’ - अविनाश धर्माधिकारी

‘शतक पाहिलेला माणूस’ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास क्रमिक पुस्तकांतून दाबण्यात आला. ही पुस्तके प्रसारित करणाऱ्यांनी केवळ दीड-दोन पानांत या इतिहासाची बोळवण केली, अशी टीका मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केली. ‘मराठ्यांचा इतिहास म्हणजे संधीकाळातील तळटीप नाही, तर महाराष्ट्राने देशाकरिता केलेल्या पराक्रमाचा दैदीप्यमान इतिहास आहे. हा इतिहास सगळ्या देशाला समजायला हवा’, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

सह्याद्री प्रकाशनतर्फे डॉ. सागर देशपांडे संपादित ‘शतक पाहिलेला माणूस’ या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी खासदार प्रदीप रावत आदी उपस्थित होते.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘बाबासाहेब पुरंदरे यांनी लोकांच्या दृष्टीतून इतिहास लिहिला, त्यामुळे त्यात लालित्य होते. त्याला चूक म्हणायचे कारण नाही. त्यांनी पुराव्यांवर आधारित इतिहास लिहिला. ज्या ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, त्या सर्वांपेक्षा अधिक खरा इतिहास ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातून बाबासाहेबांनी मांडला.’’

गोखले म्हणाले, ‘‘सर्जिकल स्ट्राईक आपण आत्ता केला, असे आपल्याला वाटते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. गनिमी कावा, सर्जिकल स्ट्राईक अशा अनेक गोष्टी आपण इतिहासातूनच घेतल्या आहेत.’’ डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिले, त्यांनीच नंतर बाबासाहेबांवर टीका केली. अशा लोकांच्या टीकेला फारसे महत्त्व द्यायची गरज नाही.’’

महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर...

‘‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत मला ‘छत्रपती शिवाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर काय झाले असते’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी ‘महाराजांनी तेव्हाच दिल्ली काबीज केली असती आणि भारताचे सर्वोच्च सत्ताधीश म्हणून ते विराजमान झाले असते’, असे उत्तर दिले. इंग्रजांनीही मुघलांना पराजित करून नव्हे, तर मराठ्यांकडून देश काबीज केला’’, असे अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT