नगर परिषदेच्या सभेचे इतिवृत्त देण्यास टाळाटाळ! sakal
पुणे

नगर परिषदेच्या सभेचे इतिवृत्त देण्यास टाळाटाळ!

नगरपरिषदांच्या सभांचे संपूर्ण इतिवृत्त जाहीर करावे अशी मागमी वारंवार केली जात असली तरी नगर परिषद संचालनालयाकडून त्यासाठी टाळाटाळ केली जात आहे

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे : विधीमंडळाच्या धर्तीवर नगरपरिषदांच्या सभांचे संपूर्ण इतिवृत्त जाहीर करावे अशी मागमी वारंवार केली जात असली तरी नगर परिषद संचालनालयाकडून त्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचा इशारा कायदेशीर व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला आहे. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती यांनी इतिवृत्त ठेवणे आवश्‍यक आहे. त्याचा अध्यादेश राज्यातील सर्व संस्थांना सह आयुक्त नगरपालिका प्रशासन विभागातर्फे पाठविण्यात आला आहे.

परंतु, यासंदर्भातील कोणत्याही नियमात सुधारणा न करता केवळ सभांमध्ये पारित झालेले ठराव नगर परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे हा संचालनालयाचा आदेश अपारदर्शक व काळाशी सुसंगत नाही असा आरोप नागरी हक्क कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र., सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान, मनीषा देशपांडे यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवकांनी काय केले? कोणते निर्णय घेतले? कोणत्या प्रश्‍नांचा प्राधान्याने विचार केला?, त्यावर कोणते उपाय शोधले गेले ही माहिती नागरिकांना मिळणे आवश्‍यक आहे. विविध समित्यांनी काय निर्णय घेतले, त्याचे कागदपत्र बघायला, वाचायला मिळाले पाहिजेत. पण दुर्दैवाने हे घडत नाही, असे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT