Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : पुणे, मुंबईतील पब आणि बारला टाळे;कल्याणीनगर प्रकरणानंतर कारवाईचा हातोडा

पुणे पोर्श मोटार अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतर पब आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना मिळणाऱ्या मद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब, बारची तपासणी मोहीम विभागाने हाती घेतली.

सकाळ वृत्तसेवा

-नितीन बिनेकर

मुंबई: पुणे पोर्श मोटार अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतर पब आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना मिळणाऱ्या मद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब, बारची तपासणी मोहीम विभागाने हाती घेतली. या तपासणीत ८७ बार सील करण्यात आले तर पुण्यातील आणि मुंबईतील जवळपास १३० पबवरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने २० विशेष तपासणी पथकांची स्थापना केली. त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून बोलावून घेतले होते. या पथकाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेनंतर पुण्यातील ६५ पब आणि ५१ बारला टाळे ठोकले आहेत. राज्यभरातील एकूण १७९ बारची तपासणी करून दोषी आढळलेले ७९ बार सील करण्यात आले. राज्यात सर्वाधिक पब मुंबई आणि उपनगरात आहे. त्यामुळे तेथे विशेष तपासणी केली. या तपासणीनंतर ७० पबवर कारवाई करण्यात आली.

मुदतीनंतरही बार सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्य देणाऱ्या पब, बार, रेस्टॉरंटवर आमची धडक कारवाई सुरू आहे. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व पब, बार, रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे योग्य पालन करावे.

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT