Avoid recycling of edible oil Food and Drug Administration warns professionals pune
Avoid recycling of edible oil Food and Drug Administration warns professionals pune edible-oil
पुणे

खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळा; अन्यथा कारवाई अन्न व औषध प्रशासनाचा व्यावसायिकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार खाद्यतेलाचा वापर तळण्यासाठी शक्यतो एकदाच करावा. खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना तयार होणारे ‘ट्रान्सफॅट’ टाळण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त तीन वेळेस वापर करावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

ज्या अन्न व्यावसायिकांकडून ५० लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर केला जातो, अशा व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुनर्वापराची लेखी माहिती ठेवावी. उपयोगात आलेल्या खाद्यतेलाची माहिती अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण, नवी दिल्ली या मान्यताप्राप्त संस्थेकडे द्यावी. तसेच, त्याबाबतचा अभिलेख जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानद कायदा कलम ५५, ५७ व ५८ आणि भा.दं.वि. कलम २७२ व २७३ नुसार कारवाईची तरतूद आहे.

अखाद्य खाद्यतेलाचा असा वापर शक्य

उपयोगात आलेले अखाद्य खाद्यतेल जमा करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्था किंवा प्रतिनिधींनी हे तेल बायोडिझेल, साबण, वंगण याचे उत्पादन करण्यासाठी वापरावे. कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती किंवा भेसळीसाठी करू नये. खाद्यतेलाबाबत नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT