पुणे

‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णसंख्येत वाढ

CD

पुणे, ता. २९ : सणासुदीच्या निमित्ताने शहराच्या मध्यवस्तीत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यात स्वाइन फ्लूचा (एच१एन१) प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जुलैमध्ये ३५ असलेले रुग्ण ऑगस्टमध्ये २२५ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
ताप, खोकला, घसा खवखवणे ही ‘स्वाइन फ्लू’ची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, काही रुग्णांमध्ये पुढे न्यूमोनिया होत असल्‍याचे दिसून येत आहे. तर, काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची शक्‍यता वाढते, अशी माहिती डॉक्‍टर देतात. प्रामुख्‍याने जोखमीच्‍या रुग्‍णांमध्‍ये ही शक्‍यता वाढते. ज्‍यांना सहव्‍याधी (कोमॉर्बिडिटी) आहेत, त्‍यांच्‍यात तसेच वयोवृद्धांमध्‍ये शक्‍यता अधिक वाढते. त्‍यांनी अधिक काळजी घेण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

गर्दीत संसर्गाचा धोका :
सार्वजनिक मंडळे, मिरवणुका, बाजारपेठा आणि विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे श्‍वसनमार्गातून पसरणाऱ्या इन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढू शकतो. हा विषाणूबाधित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कातून जसे की खोकणे, बोलणे किंवा शिंकणे यांतून पसरतो. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

विषाणू सौम्‍य, मात्र काळजी गरजेची :
सध्‍या देशात ‘स्वाइन फ्लू’ विषाणूचा जुनाच प्रकार सक्रिय झाला असून, तो सौम्‍य असल्‍याने घाबरण्याचे कारण नसल्याचा निर्वाळा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या आधी दिला आहे. विषाणूमध्ये कोणताही जनुकीय बदल होऊन नवीन घातक प्रकार तयार झालेला नाही. मात्र, प्रसार टाळण्‍यासाठी काळजी घेण्‍याची गरज आहे.

‘‘ताप, सततचा खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, अशक्तपणा यांसारखी स्‍वाईन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्‍यांच्‍या तपासण्यांचे अहवालही बाधित असल्‍याचे येत आहेत. गणेशोत्‍सव जवळ आला असून गर्दीमध्‍ये मास्क वापरावा. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्‍वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होणे, यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.’’
- डॉ. भूषण किन्‍होळकर, फिजिशियन

प्रतिबंधात्मक उपाय
१. गर्दी टाळा, मास्क वापरा
२. खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड रुमाल किंवा टिश्यूने झाका
३. हात वारंवार साबणाने धुवा, सॅनिटायझर वापरा
४. ताप, खोकला किंवा घसा दुखत असल्यास गर्दीत जाणे टाळा
५. उच्च-जोखमीच्‍या गटातील नागरिकांनी इन्फ्लुएन्झाची लस घ्या
६. स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे घेऊ नका

शहरातील रुग्‍णसंख्‍या
जानेवारी - ०
फेब्रुवारी - २
मार्च - ०
एप्रिल - ५
मे - १०
जून - १३
जुलै - ३५
ऑगस्ट - २२५
(स्रोत : मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट, पुणे महापालिका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC सचिवपदी सौरभ कटियार, अध्यक्षपदाचा कार्यभार कुणाकडे सोपवणार?

Satara District Bank Chairman : 'अध्यक्ष भाजपचाच होणार, नाहीतर स्वबळावर लढणार'; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने महायुतीसमोर नवी कोंडी? राजकीय संघर्ष पेटणार?

IND vs NZ Squad Updates: श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, इशान किशन-रोहित शर्मा ओपनिंग जोडी; न्यूझीलंड दौऱ्यावर पाहायला मिळेल नवी टीम...

Maharashtra Live News : राज्यातील आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्र्यांची माहिती

माजी IAS अधिकाऱ्याला अटक, ११९८ पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा होता आरोप

SCROLL FOR NEXT