पुणे

‘सकाळ प्रकाशन’च्या दोन पुस्तकांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या मराठी भाषा समितीतर्फे विविध साहित्यकृतींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली आहे. ‘सकाळ प्रकाशन’च्या ‘निदान’ या पुस्तकासाठी डॉ. सुरेश शिंदे आणि ‘३० सामर्थ्यशाली स्त्रिया’ या अनुवादित पुस्तकासाठी वर्षा गजेंद्रगडकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

२०१५ आणि २०१६ या दोन वर्षांसाठीच्या १७ पुरस्कारांची घोषणा महापौरांनी केली. पुरस्कारांसाठी मराठी अनुवाद, बालसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, आर्थिकविषयक लेख, विज्ञान लेख, नवोदित साहित्यिक, मुद्रितशोधक अशा विविध विभागांमध्ये १०६ साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या. महापौरांच्या अध्यक्षतेखाली भाषा समितीच्या बैठकीत १७ साहित्यकृतींना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत नवोदित साहित्यिकांचे पहिले पुस्तक या विभागासाठी डॉ. सुरेश शिंदे यांना, तसेच अनुवादित पुस्तक विभागात लेखिका व अनुवादक वर्षा गजेंद्रगडकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पुरस्कारार्थींमध्ये प्रभाकर करंदीकर, डॉ. लीला दीक्षित, मंदाकिनी खांडगे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, राजीव बर्वे, विलास चाफेकर, सुजाता फडके, मंजूषा आमडेकर, अनिल दांडेकर, ॲड. आनंद गवळी, डॉ. हणमंत सरदेसाई, मनीषा बाठे आणि अजित आपटे यांचा समावेश आहे. रोख २५ हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे  स्वरूप आहे. 

या पुरस्काराचे वितरण, तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना येत्या सोमवारी (ता. ९) सकाळी साडेअकराला महापालिका भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे आणि वीणा देव यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT