Social-Media
Social-Media 
पुणे

Coronavirus : ‘चला, सारे मिळून, कोरोना हटवूया’

सकाळवृत्तसेवा

पिंपरीत महापालिका, सेलिब्रिटींकडून सोशल मीडियावर आवाहन 
पिंपरी - कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. 

आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक आणि ट्‌विटर अकाउंटवरूनही लोकप्रतिनिधींसह मराठी चित्रपटातील सिनेतारकांनी ‘चला, सारे मिळून, कोरोना हटवूया’ असे आवाहन केले आहे. सेलिब्रिटींनी दोन मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप या फेसबुक व ट्विटरवर अपलोड केली आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या शेअर करण्यात येत आहे. 

महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे या राजकीय पुढाऱ्यांसह ज्येष्ठ सिनेअभिनेते संजय मोने यांनी ‘घाबरू नका, पण सावध राहा’ असे आवाहन केले आहे. 

भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे यांनी ‘लेट्‌स फाइट अगेंस्ट कोविड-१९’ अशा शब्दात; तर अतुल परचुरे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, भार्गवी चिरमुले यांनी व्हिडिओद्वारे शहरातील नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच, बचाव करण्यासाठी #coronapcmc या हॅशटॅगद्वारे प्रशासनामार्फत निर्देशित केलेल्या सूचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन शहरवासीयांना करण्यात येत आहे.      

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त जनजागृतीपर माहिती महापालिकेच्या फेसबुक व ट्विटर अकाउंटद्वारे नागरिकांपर्यंत पोचविण्यात येत आहे. तसेच, विविध रेडिओवर देखील उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT